मुंबईकरांच्या दृष्टीने निराशाजनक अर्थसंकल्प - ज्ञानराज निकम - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

29 August 2012

मुंबईकरांच्या दृष्टीने निराशाजनक अर्थसंकल्प - ज्ञानराज निकम

मुंबईकरांच्या दृष्टीने निराशाजनक अर्थसंकल्प - ज्ञानराज निकम
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या वेळी सत्ताधारी पक्षाने जाहीर केलेल्या 'वचननामा'मध्ये मुंबईकरांना पाणी, आरोग्य, रस्ते, शिक्षण, स्वच्छता, मलनि:सारण, विकास नियोजन, मैदाने-उद्याने आणि इतर मूलभूत नागरी सुविधांबाबत अनेक स्वप्ने दाखवली; पण सत्ताधार्‍यांनी सादर केलेल्या पहिल्याच अर्थसंकल्पात त्यांनी दिलेल्या आश्वासनाचे कोणतेही प्रतिबिंब दिसून येत नाही. मुंबईकर जनतेच्या दृष्टीने अत्यंत निराशाजनक असा हा अर्थसंकल्प असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी केला.

मुंबईच्या विकासाबाबत दूरदृष्टी, संकल्पना आणि नियोजनाचा सत्ताधारी पक्षाकडे अभाव असल्यामुळे मुंबईचा आंतरराष्ट्रीय दर्जा उंचावण्याच्या दृष्टीने कोणतेही भरीव कार्य गेल्या 17 वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात केल्याचे दिसत नाही.वर्षानुवर्षे अर्थसंकल्पामध्ये केवळ आकडय़ांचा खेळ मांडणे हेच काम सत्ताधारी करत असल्याचे निकम यांनी सांगितले. हा अर्थसंकल्प अत्यंत निराशाजनक असून सत्ताधार्‍यांची प्रशासनावर पकड नसल्याचे यावरून दिसते, असेही त्यांनी सांगितले. मुंबईतील नागरिकांना अधिक चांगल्या नागरी सुविधा मिळण्यासाठी भांडवली खर्चाच्या ज्या योजना आहेत, त्या वेळेत पूर्ण करणे अत्यंत गरजेचे आहे. पालिकेच्या उत्पन्नाचे महत्त्वाचे स्नेत असणार्‍या जकात खात्यासाठी आधुनिकीकरणाचा पर्याय स्वीकारला गेला पाहिजे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS