वरिष्ठांकडे तक्रार म्हणजे कामकाजात अडथळा नाही - उच्च न्यायालय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

वरिष्ठांकडे तक्रार म्हणजे कामकाजात अडथळा नाही - उच्च न्यायालय

वरिष्ठांकडे तक्रार म्हणजे कामकाजात अडथळा नाही - उच्च न्यायालय

सरकारी अधिकाऱ्यांविरुद्ध वरिष्ठांकडे तक्रारअर्ज करणे म्हणजे त्या अधिकाऱ्याच्या कामात अडथळा आणण्याचा गुन्हा होत नाही किंवा त्याची बदनामीही होत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने तळोजा मॅन्युफॅक्‍चरिंग असोसिएशनच्या प्रकरणात दिला आहे. या संघटनेने संजीव सावंत आणि केतन जोशी या वकिलांमार्फत केलेल्या याचिकेवर मुख्य न्यायाधीश मोहित शहा आणि न्या. नितीन जामदार यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. 
  उपसंचालक (इंडस्ट्रिअल सेफ्टी अँड हेल्थ) या पदावर काम करणारे एस. पी. कुलकर्णी यांनी सदस्यांना त्रास दिल्याची लेखी तक्रार असोसिएशनने सरकारकडे केली होती. अशी तक्रार करणे म्हणजे आपली बदनामी करण्यासारखे, तसेच आपल्या सरकारी कर्तव्यात ढवळाढवळ करण्यासारखे आहे. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करावी, असा अर्ज कुलकर्णी यांनी वाशी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे केला होता. त्या अर्जाचे कामकाजही खंडपीठाने रद्दबातल केले.  

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS