शासकीय वसतिगृहांत बीपीएल विद्यार्थ्यांनाही आरक्षण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 August 2012

शासकीय वसतिगृहांत बीपीएल विद्यार्थ्यांनाही आरक्षण

शासकीय वसतिगृहांत बीपीएल विद्यार्थ्यांनाही आरक्षण
सामाजिक न्याय विभागामार्फत मागासवर्गीयांसाठी राज्यभरात चालविण्यात येणाऱ्या सरकारी वसतिगृहांमध्ये आता दारिद्य्ररेषेखालील (बीपीएल) विद्यार्थ्यांनाही 15 टक्के आरक्षण ठेवण्यात येणार आहे. 
   यापूर्वी 15 टक्के राखीव जागांवर विशेष बाब म्हणून प्रवेश देण्याचे अधिकार सामाजिक न्यायमंत्र्यांकडे होते. पण विद्यमान सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी या 15 टक्‍क्‍यांवर दारिद्य्ररेषेखालील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. हे प्रवेश संबंधित जिल्ह्यांतील विशेष जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांमार्फत दिले जातील. या जागांवर प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 30 ऑगस्टपर्यंत संबंधित जिल्ह्याच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांकडे अर्ज सादर करता येतील. जे विद्यार्थी मुंबई, पुण्यामध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी येतात. पण हलाखीच्या परिस्थितीमुळे त्यांना शिक्षण घेणे परवडत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय फायद्याचा ठरेल, असे सूत्रांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS