२५० संकेतस्थळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

२५० संकेतस्थळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

२५० संकेतस्थळ बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय
आसाम िहसाचाराच्या पाश्र्वभूमीवर संकेतस्थळांच्या माध्यमातून भडकाऊ छायाचित्रे तसेच चित्रफीत प्रसारीत करून मुस्लीमांना ईशान्य भारतीयांच्याविरोधात भडकावण्याचे प्रकार लक्षात घेता केंद्र सरकारने तब्बल २५० संकेत स्थळे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत १३० संकेतस्थळे बंद करण्यात आली असून उर्वरित लवकरच बंद करण्यात येतील,अशी माहिती गृहविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
आसाम िहसाचारानंतर ईशान्य भारतीयांवर हल्ले करण्याच्या अफवांनी देशभरात खळबळ उडाली आहे.संकेतस्थळांवरूनही जातीय तेढ वाढविणाचा प्रयत्न सुरु असल्यामुळे केंद्र सरकारने याप्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या सर्व प्रकरणामागे पाकिस्तानस्थित काही गट सक्रीय असल्याचा दाट संशय असून भारतात सुरु झालेल्या या सायबर युद्धाच्या पाश्र्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सरकारने सीईआरटी (कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ) अर्थात संगणकीय आपातकालीन कृतीगटाचे सहाय्य घेण्याचा निर्णय घेतला आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS