मनसेच्या मोर्चासाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

मनसेच्या मोर्चासाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त

मनसेच्या मोर्चासाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त
सीएसटी परिसरात ११ ऑगस्ट रोजी झालेल्या हिंसाचाराविरोधात उद्या मनसे मोर्चा काढणार आहे. या मोर्चासाठी पोलिसांनीही सुरक्षेच्या दृष्टीने तयारी केली आहे. मनसेच्या उद्या होणाऱ्या मोर्चासाठी १५ हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे.
मुंबईचे तीन अतिरिक्त पोलिस आयुक्त या मोर्चादरम्यान या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवतील. तत्पूर्वी मोर्चासाठी मनसेकडून एक लाख लोकांची परवानगी मागण्यात आली आहे.
  दरम्यान या मोर्चाआधीच आझाद मैदान पोलिसांनी मनसेचे विभागप्रमुख अरविंद गावडे यांना नोटीस बजावली आहे. पोलिसांनी मनसेला कलम १४९ अंतर्गत प्रतिबंधात्मक नोटीस बजावली आहे. मोर्चादरम्यान कोणतीही अप्रिय घटना घडल्यास त्याला सर्वस्वी मनसे जबाबदार असेल, असं या नोटीशीमध्ये लिहिण्यात आलं आहे. मनसेचा उद्या दुपारी १२ वाजता गिरगाव चौपाटी इथून मोर्चा निघणार आहे. गृहमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी करत हा मोर्चा आझाद मैदानावर पोहचणार आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS