शाहरुख खान विरोधात राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी तक्रार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 August 2012

शाहरुख खान विरोधात राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी तक्रार

शाहरुख खान विरोधात राष्ट्रध्वजाच्या अवमान प्रकरणी तक्रार
srk.jpg
शाहरुख खान आणि वादांची मालिका संपताना दिसत नाही. आयपीएलचा राडा, जाहीरपणे सिगरेट पिणे, सलमान-कुंदराशी मारामारी, गांगुली-शोएबसोबत झालेली भांडणे यानंतर शाहरुख आता राष्ट्रध्वजाच्या अपमानप्रकरणी अडकला आहे. पुण्यातील चतुश्रृंगी पोलिसांनी राष्ट्रध्वजाच्या अवमानप्रकरणी त्याच्याविरोधात तक्रार नोंदविली आहे. 
   एप्रिल २०११ मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रात्रभर सुरू असलेल्या जल्लोषात शाहरुखही गाडी घेऊन बाहेर पडला. त्याने आपल्यासोबत तिरंगा आणला होता. पण तो उलटा फडकावला होता. तो तसाच ठेवून तो गाडीवर उभा राहून उन्मादाने फडकवत राहिल्याचे विडिओ चित्रण उपलब्ध झाले आहे. ते इंटरनेटवरही फॉरवर्ड होते आहे. या विडिओच्या आधारे युवा लोकशक्ती पार्टीने चतुशृंगी पोलिसांकडे तक्रार नोंदविली आहे. याच युवा लोकशक्ती पार्टीने केलेल्या तक्रारीमुळे नुकतेच गहना वशिष्ट या मॉडेलला अटक करण्यात आली होती. तिनेही तिरंगा गुंडाळून केलेल्या फोटोशुटमुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात आली होती.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS