महापुरुषांच्या बदनामीचे उद्योग थांबवा : बसप - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2012

महापुरुषांच्या बदनामीचे उद्योग थांबवा : बसप


महापुरुषांच्या बदनामीचे उद्योग थांबवा : बसप



मुंबई / अजेयकुमार जाधव 

बहुजन समाजातील महापुरुषांची निंदानालस्ती करण्याचे राज ठाकरे यांनी थांबवावेत, अन्यथा त्याच्या तीव्र प्रतिक्रिया उमटतील, असा इशारा बहुजन समाज पार्टीने बुधवारी पत्रकार परिषदेत दिला. राज ठाकरे यांनी इंदू मिलसंदर्भात दलित नेत्यांवर केलेल्या टीकेला ‘बसपा’च्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले.
   उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे गौतम बुद्धांच्या पुतळ्याची नव्हे, तर भगवान महावीर यांच्या पुतळ्याची मोडतोड झाली होती. त्या घटनेचा निषेध मायावती यांनी लोकसभेत तातडीने केला होता. तसेच बसपाच्या वतीने ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली होती. त्यामुळे राज ठाकरे यांनी केलेले विधान अपु-या माहितीवर आधारित होते. त्यांनी आधी लोकसभेतील कामकाजाची माहिती घ्यावी आणि नंतर  बोलावे, असा टोला खासदार वीरसिंह यांनी लगावला.
   बसपाचे महाराष्‍ट्र अध्यक्ष विलास गरुड म्हणाले की, पोलिसांनी परवानगी दिलेली नसताना राज यांनी मंगळवारी मोर्चा काढून कायदा मोडला आहे. त्यामुळे त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. गौतम बुद्धांच्या मूर्ती तोडफोडीची दिशाभूल करणारी माहिती देऊन राज ठाकरे समाजामध्ये तेढ निर्माण करत आहेत. बहुजनांना वेड्यात काढण्याचे उद्योग राज यांनी थांबवावेत,  अशी टीकाही त्यांनी केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS