रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2012

रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करा


रझा अकादमीकडून नुकसानभरपाई वसूल करा
मुंबई : महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असणार्‍या 'अमर जवान ज्योत'ची तोडफोड करून महापालिकेच्या मालमत्तेचे नुकसान करणार्‍या रझा अकादमीविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे केली आहे.
 आसाम आणि म्यानमारमध्ये होत असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ रझा अकादमी, सुन्नी जमाइतुल उलेमा आदी संघटनांच्या माध्यमातून आझाद मैदानात मोर्चा काढण्यात आला होता. या जमावातील काही आंदोलनकांनी सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केले होते.सीएसटी परिसरात उभ्या असलेल्या गाडय़ाही फोडून आगी लावण्यात आल्या होत्या. काही वृत्तवाहिन्यांची वाहनेही त्यात लक्ष्य करण्यात आली. या आंदोलकांनी 'अमर जवान ज्योत' शिलाची नासधूसही केली. 
  त्यानंतर पालिका प्रशासनाने तत्काळ शिल्प पूर्ववत करून तातडीने दुरुस्तीही करून घेतले. पण या नुकसानीचा भूर्दड मनपाला सोसावा लागला. त्यामुळे रझा अकादमीविरुद्ध पालिका प्रशासनाने गुन्हा दाखल करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करावी, अशी मागणी शेवाळे यांनी केली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS