पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची बदली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची बदली

पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची बदली

आझाद मैदान हिंसाचारप्रकरणी टीका होत असलेले मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांची आज अखेर बदली करण्यात आली आहे. गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज त्यांची बदलीची घोषणा केली. पटनायक यांना महासंचालकपदी बढती देण्यात आली आहे. त्यांना राज्य रस्ते विकास महामंडळाचे महासंचालक करण्यात आले आहे. तर मुंबईच्या आयुक्तपदी सत्यपाल सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
     आझाद मैदान हिंसाचार प्रकरणी अरुप पटनायक यांच्यावर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अरुप पटनायक यांची बदली आणि आर. आर. पाटील यांच्या राजीनाम्यासाठी गिरगाव चौपाटी ते आझाद मैदान असा मोर्चा काढला होता. त्यानंतर आझाद मैदानावर राज ठाकरे यांनी सभा घेत पटनायक यांच्या बदलीची मागणी केली होती. या सभेनंतर पटनायक यांच्या बदलीबाबत जोरदार हालचाली सुरु झाल्या होत्या आणि मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही पटनायक यांच्या बदलीचा अर्ज आपल्याकडे आल्याचे सांगितले होते. अखेर आज पटनायक यांची बदली करण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS