भारतीयांवर हल्ले करण्याची उल्फाची धमकी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2012

भारतीयांवर हल्ले करण्याची उल्फाची धमकी

भारतीयांवर हल्ले करण्याची उल्फाची धमकी
देशातील विविध भागांमध्ये राहत असलेल्या आसामी नागरिकांवर अत्याचार होत राहिले तर आसाममधील भारतीयांवर हल्ले केले जातील, अशी धमकी अल्फा या दहशतवादी संघटनेने आज (रविवार) दिली. 

उल्फाचा प्रमुख परेश बरुआ याची सही असलेले वक्तव्य आज जाहीर करण्यात आले. त्यात आरोप करण्यात आला आहे, की भारतात 14 आसामी युवकांची हत्या करण्यात आली आहे. देशातील काही भागांमध्ये आसामी नागरिकांवर होत असलेले अत्याचार तत्काळ थांबायला हवेत. अन्यथा आसाममधील भारतीयांवर हल्ले केले जातील. भारतातील मुस्लीम गटांनी आसामींबाबत द्वेष कायम ठेवला तर गंभीर परिणाम भोगावे लागतील. 

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचा प्रमुख बद्रुद्दीन अजमल वांशिक भेदभावाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोप उल्फाने केला आहे. आसाममध्ये मुस्लिमांची हत्या करण्यात आली, हा त्याचा दावाही खोडून काढला आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS