मीडियामुळे बलात्कारांमध्ये वाढ -ममता बॅनर्जी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

26 August 2012

मीडियामुळे बलात्कारांमध्ये वाढ -ममता बॅनर्जी

मीडियामुळे बलात्कारांमध्ये वाढ -ममता बॅनर्जी
प्रसार माध्यमांमुळे बलात्कार आणि आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ होत आहे, असे खळबळजनक वक्तव्य पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आज (रविवार) केले. बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पश्‍चिम बंगाल सरकारवर आधीच चोहोबाजूंनी टीका होत असताना ममता बॅनर्जी यांनी प्रचार माध्यमांना लक्ष्य केले आहे. 

तृणमूल कॉंग्रेस पक्षाच्या रॅलीत ममता बॅनर्जी म्हणाल्या, की आता प्रसार माध्यमांची मालकी व्यावसायिक प्रतिष्ठानांकडे आहे. 
त्यामुळे ते हवे तसे वृत्त देतात. राज्याचे शहर विकासमंत्री फरहाद हकीम यांनी मला सांगितले, की 50 हजार ते 1 लाख रुपयांमध्ये हवे ते छापता येते. नको असलेले वृत्त मागे घेतले जाते. वृत्तवाहिनीची मालकी असल्यामुळे कुणी बलात्कार आणि आत्महत्यांना प्रोत्साहन देऊ शकत नाही. जे सत्य आहे, तीच बातमी द्यायला हवी. गुन्हेगारीला प्रोत्साहन देणे चुकीचे आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS