नागपुरात ढोबळेंवर महिलांची चप्पलफेक - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 August 2012

नागपुरात ढोबळेंवर महिलांची चप्पलफेक

दलित महिलेवरील अत्याचाराविरुद्ध मोर्चे कशाला?
नागपुरात ढोबळेंवर महिलांची चप्पलफेक


राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी नेते लक्ष्मणराव ढोबळे यांना आज नागपुरात दलित महिलांवरील अत्याचाराबाबत केलेले विधान चांगलेच महागात पडले. अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनात प्रमुख पाहुणे म्हणून गेलेल्या ढोबळे यांच्या गाडीवर संतप्त महिलांनी चपला भिरकावल्या.

महिला अत्याचाराच्या प्रकरणात आक्षेपार्ह विधान केल्यावरून राज्याचे पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांना रविवारी मारहाण झाली. आमदार निवास परिसरात अण्णाभाऊ साठे साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी हा प्रकार घडला. राजकीय वितुष्टातून मारहाण झाल्याचीही चर्चा आहे. 

संमेलनाच्या समारोपासाठी ढोबळे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. नियोजित कार्यक्रमानुसार शनिवारी उद्घाटन समारंभासाठीच ते येणार होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ‍ॅड. गोविंद पानसरे होते. ढोबळे आपल्या भाषणात महिला अत्याचाराच्या मुद्द्यावर बोलले. मार्क्सवाद्यांच्या कार्यालयातच मार्क्सवादी नेत्यांच्या तसबिरी नसल्याचाही उल्लेख त्यांनी केला. सायंकाळी ते संमेलनस्थळातून बाहेर जात होते. महिलांसह काही कार्यकर्त्यांनी त्यांना प्रश्न विचारले. महिला अत्याचारासंबंधीच्या प्रश्नावरून ढोबळे यांच्याशी त्यांची बाचाबाची झाली.  ढोबळे समर्थकही आक्रमक झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी झाली. ढोबळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ‘साहेब काहीही बोलू इच्छित नाहीत’, असे त्यांच्या एका निकटवर्तीयाने फोनवर सांगितले. 

बीडमधील घटनेचे पडसाद : ढोबळे आणि संमेलनाचे अध्यक्ष अ‍ॅड. एकनाथ आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये जुनाच वाद असल्याचे बोलले जाते. बीड जिल्ह्यात एका महिलेवर अत्याचार झाला होता. त्याच्या निषेधार्थ जिल्हा परिषदेतील एका आव्हाड समर्थक कर्मचा-याच्या नेतृत्वाखाली मोर्चाही काढण्यात आला होता. मोर्चानंतर त्या कर्मचा-याला नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. या घटनेमुळे आव्हाड समर्थकांमध्ये रोष होता. कर्मचा-यावरील कारवाईस ढोबळे यांना जबाबदार धरण्यात आले होते. तेव्हापासून ढोबळे आणि आव्हाड समर्थकांमध्ये वाद सुरू होता.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS