‘पटनायक’ना बदलीच्या धक्क्याने हार्टऍटॅक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

‘पटनायक’ना बदलीच्या धक्क्याने हार्टऍटॅक

Share This
‘पटनायक’ना बदलीच्या धक्क्याने हार्टऍटॅक

आझाद मैदान येथील मुसलमानांची दंगल नीट हाताळली नाही म्हणून अरुप पटनायक यांची मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरून उचलबांगडी करण्यात आली आणि त्यांची महाराष्ट्र औद्योगिक सुरक्षा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून राज्य शासनाने नियुक्ती केली. याचा प्रचंड धक्का पटनायक यांना बसला. त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रुग्णालयात दाखल करण्यात आले. आता त्यांची प्रकृती सुधारत आहे, परंतु त्यांना सुरक्षा विभागात काम करायचे नसून प्रतिनियुक्तीवर सीबीआयमध्ये काम करायचे आहे अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीय अधिकार्‍याने दिली.
एका दैनिकाशी बोलताना एक अधिकारी म्हणाला, पटनायक यांना नाहक बळीचा बकरा बनविण्यात आले. दंगल पटनायक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच सुरू झाली. पोलिसांवर जास्त हल्ले झाले, परंतु पोलिसांनी जर गोळीबार केला असता तर मोठ्या प्रमाणात मनुष्यहानी झाली असती. पटनायक यांचे समर्थन करताना हा अधिकारी पुढे म्हणाला, पटनायक यांनी गेल्या वर्षीच्या १ मार्चला मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून सूत्रे हाती घेतली तेव्हापासून त्यांनी आपल्या कामाचा झपाटा सुरू केला. पोलिसांच्या कॅण्टीन चकाचक केल्या. त्यांच्या मालकीची घरे व्हावीत म्हणून पनवेल येथे भूखंड घेतला. पोलिसांच्या मुलांना नोकर्‍या मिळाव्यात म्हणून वरळी येथे प्लेसमेंट सेंटर सुरू केले. मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा कायापालट व्हावा म्हणून सरकारला प्रस्ताव पाठविला. नायगाव येथे दीड कोटी खर्च करून कॅन्सर हॉस्पिटल सुरू केले. अशा कितीतरी पोलिसांच्या हिताच्या योजना त्यांनी गेल्या दीड वर्षात सुरू केल्या. याआधीच्या कोणत्याही पोलीस आयुक्ताने मुंबई पोलिसांच्या वेल्फेअरसाठी इतके प्रयत्न केले नव्हते. तरीही त्यांची आझाद मैदान येथील दंगलीचे निमित्त साधून बदली करण्यात आली. याचा पटनायक यांना जबरदस्त धक्का बसला आहे, असेही या अधिकार्‍याने सांगितले.
पटनायक यांना नाहक बेइज्जत करण्यात आले. त्यामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या रक्तवाहिनीमध्ये पाच स्टेन टाकण्यात आले अशी माहिती देताना हा अधिकारी म्हणाला, पटनायक यांनी यापूर्वी सीबीआयमध्ये चांगले काम केले आहे. राज्य सरकार त्यांच्या मागणीनुसार त्यांना प्रतिनियुक्तीवर दिल्लीत सीबीआयमध्ये पाठवतील अशी अपेक्षा करूया. गृहमंत्री आर. आर. पाटील यांना पटनायक यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले आहे की, सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करणार नाही, असेही या अधिकार्‍याने शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages