नारायण राणे लिफ्टमध्ये पाऊण तास अडकले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2012

नारायण राणे लिफ्टमध्ये पाऊण तास अडकले

नारायण राणे लिफ्टमध्ये पाऊण तास अडकले

राज्याचे उद्योगमंत्री नारायण राणे मुलुंड येथील एका इमारतीच्या लिफ्टमध्ये तब्बल ४० मिनिटे अडकले. याप्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत सांताक्रुझ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. 
नारायण राणे आणि त्यांचा सुरक्षा रक्षक लिंकिंग रोडवरील मंगलमूर्ती या इमारतीमध्ये गुरुवारी सकाळी ११.५० च्या सुमारास गेले. चौथ्या मजल्यावर जाण्यासाठी ते लिफ्ट मध्ये चढले, पण लिफ्ट दुसर्‍या आणि तिसर्‍या मजल्याच्या मध्येच जाऊन बंद पडली. ओटीस कंपनीचे कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी ४० मिनिटांनी नारायण राणे आणि लिफ्टमध्ये अडकलेल्या दहा जणांना बाहेर काढले. पोलिसांच्या तपासामध्ये ही लिफ्ट याआधी वारंवार बंद पडत असल्याचे आढळून आले. त्यामुळे निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिसांनी दिनेश वाघचौरे, व्ही. गोविंदराज आणि सुभाष भिरवेडेकर या तिघांना अटक केली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS