मुंबईत 97 टक्के मुलींची छेडछाड / "ईव्ह टीझिंग'विरोधात मोहीमच उघडली - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 September 2012

मुंबईत 97 टक्के मुलींची छेडछाड / "ईव्ह टीझिंग'विरोधात मोहीमच उघडली

मुंबईत 97 टक्के मुलींची छेडछाड
"ईव्ह टीझिंग'विरोधात मोहीम उघडली
'ईव्ह टीझिंग' म्हणजे मुलांकडून छेडछाड अथवा टिंगलटवाळी, या अनुभवाला मुंबईतील प्रत्येक 100 पैकी 97 मुली सामोऱ्या जातात. हे सर्वेक्षण केले आहे महालक्ष्मी येथील लाला लजपतराय कॉलेजच्या बीएमएम विभागातील पाच विद्यार्थिनींनी. विशेष म्हणजे "ईव्ह टीझिंग'बाबत 30 टक्के मुलींचा दृष्टिकोन "चलता है' असा असून 40 टक्के मुली त्याविरोधात बोलतात. याबाबत या पाच विद्यार्थिनींनी सुरू केलेल्या "अब मैं एक बजाऊ?' या मोहिमेला महाविद्यालयांत तसेच सोशल नेटवर्किंग साईटवर तरुणींचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. 

"ईव्ह टीझिंग'विरोधात मोहीमच उघडली. "अब मैं एक बजाऊ?', असे या मोहिमेचे नाव आहे. यातील "बजाऊ'तून मुलींना छेडणाऱ्याच्या कानशिलात वाजवणे अभिप्रेत नसून "शिट्टी' वाजवणे असा अर्थ आहे.  'मुलींची छेडछाड हा एक गुन्हा आहे. त्याविरोधात 509 कलमाखाली गुन्हा नोंदवता येतो, हे मुलींना ठाऊकच नसते. त्यामुळे छेडछाडीविरोधात आवाज उठविण्यासाठी मुलींमध्ये जागृती व्हावी. किमान त्यांनी अशा प्रकारची टिंगलटवाळी सहन न करता विरोध करावा, यासाठी हा उपक्रम सुरू केलाय. यात आम्ही मुलींना प्रातिनिधिक स्वरूपात शिट्टी देत आहोत.'' 

कुणी छेडत असल्यास शिट्टी वाजवून आजुबाजूच्या लोकांना गोळा करा, असे आवाहन या विद्यार्थिनी अन्य युवतींना, महिलांना करत आहेत. छेडछाड करण्याचे प्रकार बस, लोकल, सिग्नलवर थांबलेली वाहने अशा तसेच गर्दीच्या ठिकाणी सर्रास होतात, अशी नोंद या सर्वेक्षणात आहे. या मुलींनी फेसबुकवरही http://www.facebook.com/AbMainEkBajaoon या नावाने "कम्युनिटी' तयार केली आहे

महिलांसाठी असणारी 103 किंवा 1091 ही पोलिसांची हेल्पलाईन "ईव्ह टीझिंग'चीही दखल घेते, हे अनेक मुलींना ठाऊक नसते. मुलींनी त्यांची छेड काढणाऱ्याची नोंद, त्या ठिकाणासह या हेल्पलाईनवर केल्यास पोलिस त्या ठिकाणांची नक्कीच दखल घेतात

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS