अग्निशमन दलाचे केंद्राधिकारी तळेकर निलंबित - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

24 August 2012

अग्निशमन दलाचे केंद्राधिकारी तळेकर निलंबित


अग्निशमन दलाचे केंद्राधिकारी तळेकर निलंबित
मंत्रालयाला लागलेल्या आगीच्या वर्दीची नोंदबुकात खाडाखोड केल्याच्या संशयावरून संतापलेल्या केंद्राधिकारी तळेकर यांनी दलाचे जवान किशोर जाधव यांना गेल्या सोमवारी नरिमन पॉईंट येथील केंद्रातच मारहाण केल्याचा आरोप आहे. म्युनिसिपल मजदूर युनियनच्या शिष्टमंडळाने आज अग्निशमन दलाचे मुख्य अधिकारी सुहास जोशी यांची भेट घेऊन, तळेकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली. शिवसेनेच्या अग्निशमन दल लढाऊ कामगार संघटनेच्या शिष्टमंडळानेही जोशी यांची भेट घेतली आणि तळेकर यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन, तळेकर यांना निलंबित करण्यात आल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी जोशी यांनी दिली.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS