रूढी परंपरा मोडीत काढून मनोज संसारे अपक्षांचे गटनेते - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

31 August 2012

रूढी परंपरा मोडीत काढून मनोज संसारे अपक्षांचे गटनेते


रूढी परंपरा मोडीत काढून मनोज संसारे अपक्षांचे गटनेते
मुंबई / अजेयकुमार  जाधव 
 
मुंबई : 1985 च्या प्रथा परंपरेनुसार पालिकेत पाच नगरसेवकांचा गट एकत्र आला तर त्याला मान्यता देऊन त्यातील एकाची गटनेता म्हणून नेमणूक जाहीर केली जाते असे पालिकेद्वारे सांगण्यात येत असे. मात्र 50 एस 2 या नियमाचा आधार घेत वडाळा येथील अपक्ष नगरसेवक मनोज संसारे यांनी कोकण आयुक्तांकडे केलेल्या मागणीला अनुसरून कोंकण आयुक्तांनी संसारे यांना गटनेते म्हणून घोषित केल्याचे पत्र पालिकेला दिल्यावर महापौर सुनील प्रभू यांनी संसारे यांची अपक्ष नगरसेवकांच्या गटनेतेपदी निवड झाल्याचे सभागृहात जाहीर केले.

मुंबई महानगरपालिकेच्या फेब्रुवारीत झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण 15 अपक्ष नगरसेवक निवडून आले होते, पण त्यापैकी 10 अपक्ष नगरसेवकांनी शिवसेना-भाजपाबरोबर राहण्याचा निर्णय घेतला, तर राहिलेल्या पाच अपक्षांपैकी विष्णू गायकवाड, ललीता अण्णामलाई, हनीकानी इत्यादींना हाताशी धरत संसारे यांनी अपक्षांचा एक गट तयार करण्याचा प्रयत्न केला, परंतु यातील तीन नगरसेवकांनी यास विरोध केल्याने संसारे यांनी वार्ड क्रमांक १३५ च्या हनिफा बी या एका नगरसेवकासह आपला वेगळा गट तयार करून कोकण आयुक्तांकडे अर्ज केला होता.

पालिका सांगते त्याप्रमाणे कोणताही नियम नसून अपक्ष नगरसेवकांनी तट स्थ राहून आपला गात निर्माण केल्यास त्या गटाला वेग ळी मान्यता द्यावी लागते असे पालिकेच्या निदर्शनास आणले होते संसारे हे बौद्ध धरमीय असल्याने  त्यांना हे पद मिळू नये म्हणून पालिकेकडून गटनेते म्हणून घोषित करण्यास टाळाटाळ केली जात असल्याने संसारे यांनी गटनेते पद घोषित न केल्यास दलित अत्याचार विरोधी कायद्याच्या आधारे पालिकेविरोधात कारवाही करू असा इशारा दिला होता यामुळे महापौर सुनील प्रभू यांनी संसारे यांना अपक्षांचे गटनेते म्हणून घोषित केले आहे  या निर्णयामुळे आता मनोज संसारे यांनाही गटनेता म्हणून पालिकेकडून कार्यालय उपलब्ध करून द्यावे लागेल. 

संसारे यांनी दिलेल्या लढयामुळे पालिकेमध्ये एखादा अपक्ष नगरसेवक निवडून आला व त्याने आपला वेगळा गट  निर्माण केल्यास त्याला गटनेता म्हणून पालिकेला घोषित करावे लागणार आहे 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS