आझाद मैदान दंगल परकीय शक्तीनेच घडवली - सावंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

17 August 2012

आझाद मैदान दंगल परकीय शक्तीनेच घडवली - सावंत

आझाद मैदान दंगल परकीय शक्तीनेच घडवली - सावंत
मुंबई : भारत महासत्ता होऊ नये म्हणून परकीय शक्ती सर्व ताकद पणाला लावत आहे. मिळेल त्या संधीचा वापर करत भारतात दंगल घडवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. शनिवारची आझाद मैदानावरील दंगल त्याचाच एक भाग आहे, असे स्पष्ट मत ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांनी गुरुवारी मुंबई प्रेस क्लब येथे एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले. 
    बैतुल मुकदस या मसजिदचा इस्नईल देशाने केलेल्या कब्जाच्या मुक्तीसाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमाची माहिती देताना ब्रिगेडीयर सावंत बोलत होते. भारताच्या एकीला विभागण्यासाठी सौदी अरेबियाच्या इशार्‍याने शनिवारी ही दंगल झाली असल्याचे सावंत म्हणाले. तसेच अमेरिकेचा अजेंडाच आहे की, भारताला महासत्ता होऊ द्यायचे नाही, असेही ते म्हणाले. काँग्रेस व भाजपा हे एकाच नाण्याचे दोन भाग आहेत. अमेरिकेच्या इशार्‍यावर चालणारे हे पक्ष आहेत, असे सांगत येत्या 28 नोव्हेंबर रोजी एका नव्या चळवळीचा उदय होणार असनू देशातील सर्व लहान पक्ष एकत्र येत आहेत, असे त्यांनी शेवटी सांगितले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS