बाबासाहेबांविषयी राज यांची द्वेषाची भावना - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2012

बाबासाहेबांविषयी राज यांची द्वेषाची भावना - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर


बाबासाहेबांविषयी राज यांची द्वेषाची भावना - अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर


राज ठाकरे यांनी इंदू मिलच्या बाबतीत केलेले वक्तव्य म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयीचा त्यांच्या मनात असलेला द्वेष स्पष्ट होतो, असा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना केला.
   ‘गेली 25 वर्षे आपण राजकारणात आहोत. त्यामुळे  अशी वक्तव्ये करीत असताना राज यांनी आधी स्वत:चे चारित्र्य पाहावे, कमरेखालची टीका करू नये. नाही तर त्यांचे पोलखोल करायला वेळ लागणार नाही,’ असा इशाराही आंबेडकर यांनी दिला. ‘खरे तर राज यांचा हा मोर्चा म्हणजे मुद्दा न कळता काढलेला मोर्चा होता. बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात  कसे भांडण लागेल हे पाहणारा हा  मोर्चा होता. त्यामुळे तो रझा अकादमीच्या  विरोधातला असला तरी मोर्चाचे सूत्रधार वेगळेच होते,’ असा आरोपही प्रकाश आंबेडकर यांनी केला. 
    आगामी निवडणुकांमध्ये भाजपकडून नरेंद्र मोदी आणि काँग्रेसकडून राहुल गांधी धुरा सांभाळतील. त्यामुळे राजचा हा मोर्चा सनातनीवाद्यांना मदत करणारा असल्याचा आरोपही आंबेडकर यांनी केला. भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी काँग्रेसमध्ये जाऊ नये. कारण ते तिथे टिकणार नाहीत. त्यांनी आयुष्यभर ज्यांचे वाकडे केले असे लोक त्यांना कसे मदत करतील? त्यापेक्षा त्यांनी स्वतंत्र पक्ष काढावा, असे मतही आंबेडकर यांनी व्यक्त केले. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS