मुंबई आजारी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

23 August 2012

मुंबई आजारी


मुंबई आजारी 
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मलेरिया आणि गॅस्ट्रोच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयात दिवसभरात गॅस्ट्रो 35, मलेरियाचे 76 आणि स्वाईन फ्ल्यूचे 3 रुग्ण आढळून आले आहेत. 
   गेल्या आठवडय़ात मुंबईसह ठाण्यात झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. मुंबईतील विविध रुग्णालयात बुधवारी दाखल झालेल्यांमध्ये सर्वाधिक गॅस्ट्रो आणि मलेरियाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात गॅस्ट्रोचे 35, मलेरिया 76, स्वाईन फ्ल्यूचे 3 रुग्ण दाखल झाले असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. तसेच लेप्टो आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या अद्यापही जाहीर करण्यात आलेली नाही. जून महिन्यात सुमारे 1 हजार 378 रुग्ण मलेरियामुळे बाधीत होते, तर गत वर्षी हाच आकडा 5 हजार 866 एवढा होता. जुलै महिन्यात मलेरियाच्या रुग्णांची संख्या 3 हजार 339 होती. या वर्षी हाच आकडा 1 हजार 20 एवढा झाला आहे. गेल्या वर्षी जुलै महिन्यात 8 जणांचा मलेरियामुळे मृत्यू झाला होता.
    स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांच्या संख्येत मात्र हळूहळू वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. जून महिन्यापासून एकूण 35 रुग्ण स्वाईन फ्ल्यूचे पॉझिटिव्ह आढळले आहेत. जानेवारी 2012 पासून 10 जुलैपर्यंत स्वाईन फ्ल्यूचे 78 रुग्ण आढळून आले आहेत. त्यातही जून महिन्यापासून एकूण 35 नव्या रुग्णांना एच1एन1ची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे, तर 16 जुलैपर्यंत 55 गॅस्ट्रोचे रुग्ण आढळले आहे. तसेच डेंग्यूचे 13 आणि लेप्टोचा 1 रुग्ण आढळला असल्याची माहिती पालिका अधिकार्‍यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS