मुंबईत काही भागात पाणीकपात - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

मुंबईत काही भागात पाणीकपात


मुंबईत काही भागात पाणीकपात
मुंबई : मुंबई महापालिकेच्या नगरबाह्य विभागाच्या किरवली ते पोगावदरम्यान उध्र्व वैतरणा या मुख्य जलवाहिनीवर चिंचवली येथील 1200 मि.मी. व्यासाच्या झडपेच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या दुरुस्तीच्या कामासाठी 31 ऑगस्ट रोजी दुपारी 1 वाजेपासून ते शनिवार 1 सप्टेंबर रोजी दुपारी 1 वाजेपर्यंत पाणीकपात करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे पाणीकपातीच्या कालावधीत नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा पुरेसा साठा करावा आणि पाणी काटकसरीने वापरून प्रशासनाला योग्य सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या कारणास्तव पश्चिम उपनगरे(वांद्रे ते दहिसर) आणि शहरातील 'ए', 'सी', 'डी', 'जी/ उत्तर', 'जी/दक्षिण' आणि 'बी' व 'ई' या विभागांत सध्या सुरू असलेल्या 10 टक्के पाणीकपातीबरोबरच या कामामुळे अजून 10 टक्के अशी एकूण 20 टक्के पाणीकपात करण्यात येणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अधिकार्‍यांनी दिली.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS