| अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती योजनेची मुदत वाढवण्याची मागणी मुंबई : तांत्रिक कारणांमुळे अनेक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता आलेला नाही. त्यामुळे या योजनेची मुदत 15 दिवसांनी वाढवून द्यावी, अशी मागणी बृहन्मुंबई माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेतर्फे करण्यात आल्याची माहिती संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.याबाबतचे एक पत्रच महाराष्ट्र राज्याचे शिक्षण संचालक श्रीधर साळुंखे यांना पाठवण्यात आल्याचे रेडीज यांनी सांगितले. यात म्हटल्याप्रमाणे आपल्या अधिपत्याखालील आस्थापनांकडून केंद्र शासनाने जाहीर केल्याप्रमाणे मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती देण्यासाठी अर्ज संपूर्ण राज्यातून मागवण्यात आले होते. प्रत्येक शाळेने ते काटेकोरपणे न भरल्यास मुख्याध्यापक आणि शाळांवर कारवाई करण्याच्या सूचना शिक्षण विभागातून विशेष सभा घेऊन देण्यात आल्या. दरम्यान, गेल्या वर्षीपर्यंत सर्व शाळा छापील अर्जाद्वारे या योजनेचा लाभ घेत होत्या. यंदापासून अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले गेले. 25 ऑगस्टपासून पुन्हा ती सुरूझाली; परंतु तेव्हाही सर्व्हर जाम असल्याने मुख्याध्यापक आणि लिपिक वर्ग हैराण झाला. या बाबी लक्षात घेऊन जर या योजनेचा लाभ सर्वानी घ्यावा, अशी अपेक्षा असेल तर याची मुदत आणखी 15 दिवसांनी वाढवून ती 31 ऑगस्टपर्यंत करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. |
Post Top Ad
30 August 2012
Home
Unlabelled
अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती योजनेची मुदत वाढवण्याची मागणी
अल्पसंख्याक समाजातील शिष्यवृत्ती योजनेची मुदत वाढवण्याची मागणी
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment