महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथके नेमा - आ. डॉ. नीलम गोर्‍हे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 August 2012

महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथके नेमा - आ. डॉ. नीलम गोर्‍हे


महिलांवरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथके नेमा - आ. डॉ. नीलम गोर्‍हे
मुंबई : मुंबई व पुण्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ होत आहे. पुणे शहरात महिला व मुली सुरक्षित नसल्याचे मत उच्च न्यायालयानेच एका खटल्यात व्यक्त केले आहे. त्यामुळे हे अत्याचार रोखण्यासाठी पोलिसांची विशेष पथके नेमण्यात यावीत. तसेच बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर पुण्यात गणेशोत्सवापूर्वी सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू करावे, अशी मागणी शिवसेना प्रवक्त्या आ.डॉ. नीलम गोर्‍हे यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांच्याकडे केली आहे.

पुण्यात ऑगस्ट 2012 पर्यंत महिलांवर अत्याचाराच्या तब्बल 91 गुन्ह्यांची नोंद होती. मुंबईत हेच प्रमाण 201 होते. पुण्यात भाजून मरण पावणार्‍या महिलांची संख्या मोठी आहे. या सर्व प्रकरणांची सीआयडी चौकशी गृहमंत्री आर.आर. पाटील यांनी दिलेल्या आश्वासनानुसार तत्काळ सुरू करावी, तसेच 11 ऑगस्ट रोजी आझाद मैदान येथील हिंसाचाराच्या वेळी महिला पोलिसांचा विनयभंग करण्यात आला. त्या आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणीही डॉ. गोर्‍हे यांनी केली आहे. बॉम्बस्फोटांच्या पाश्र्वभूमीवर पुणे शहरात येणार्‍या गणेशोत्सव काळात सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील सीसीटीव्हीच्या प्रस्तावाला अर्थविभागाने त्वरित मान्यता द्यावी व आठवडाभरात सीसीटीव्ही बसविण्याच्या कामाला सुरुवात करावी, असेही पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांना देण्यात आलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS