राज ठाकरेंचा पुतळा जाळला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

राज ठाकरेंचा पुतळा जाळला

राज ठाकरेंचा पुतळा जाळला
अँट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा
RPI PROTEST AGAINST MNS RAJ THAKARE AT BANDRA-06.jpg
राज ठाकरे यांनी मंगळवारी झालेल्या आझाद मैदानातील सभेत इंदू मिलच्या जागेच्या विरोधात रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्यावर धडधडीत टीका केली होतीत्याचेच उत्तर आज रिपाईच्या कार्यकर्त्यांनी दिले 
     डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलच्या जागेच्या मागणीसाठी आंबेडकरी जनतेने पुकारलेल्या आंदोलनाची आझाद मैदान येथे मंगळवारी राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणात टिंगल उडवल्याप्रकरणी अँड. कनिष्क जयंत यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात बुधवारी राज ठाकरे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. डॉ. बाबासाहेबांच्या स्मारकाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी ठाकरे यांच्यावर अँट्रॉसिटीअंतर्गत गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही अँड. कनिष्क जयंत यांनी केली आहे
   महामानवाच्या आंतरराष्ट्रीय स्मारकासाठी इंदू मिलचीजागा ​ मिळण्यासाठी आंबेडकरी जनतेने पुकारलेल्याआंदोलनाची ​ मनसे नेते राज ठाकरे यांनी खिल्लीउडवून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला ,असा आरोप रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी मंगळवारी केला होता त्यानंतर बुधवारी सकाळी रिपाईच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे येथिल जिल्हाधिकारी कार्यलयासमोर जोरदार निदर्शनं केली .राज ठाकरे यांच्या विरोधात प्रचंड घोषणा दिल्या तसेच बाबासाहेबांचा हा अपमान सहन केलाजाणार नाही अशा घोषणा देत राज ठाकरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे त्यांनी दहन केले .दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन निदर्शकांना ताब्यात घेतले आहे

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS