अग्निशमन दलातील जवानाला मारहाण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

अग्निशमन दलातील जवानाला मारहाण

अग्निशमन दलातील जवानाला मारहाण
अग्निशमन दलातील जवानाला केंद्र प्रमुखाकडूनच मारहाण झाल्याची घटना काल (ता. 20) नरिमन पॉईंट अग्निशमन केंद्रात घडली. मंत्रालयाला लागलेल्या आगीची वर्दी या केंद्रालाच दिली होती. नोंदवहीत खाडाखोड झाल्याची माहिती फेसबुकवर टाकल्याचा संशय घेत या केंद्रातील किशोर जाधव या जवानाला मारहाण झाली. त्याच्यावर जी.टी. रुग्णालयात उपचार सुरू असून, पोलिस तक्रार नोंदवून घेत नसल्याचा आरोप त्याने केला आहे. 
  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोर्चासाठी गाड्यांना जाळ्या लावण्याची सूचना देण्यासाठी अग्निशमन केंद्र अधिकारी सचिन तळेकर काल रात्री नऊच्या सुमारास आले होते. गाड्यांना सकाळी जाळ्या लावू, अशी जवानांमध्ये चर्चा सुरू झाली, तेव्हा तळेकर यांनी मारहाण केल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. या घटनेत पायाला दुखापत झालेल्या जाधव यांना अन्य जवानांनी जी.टी. रुग्णालयात दाखल केले.  ड्युटीवर नसतानाही माझ्यावर राग काढण्यासाठी तळेकर केंद्रात आले आणि मला मारहाण केली, असा आरोप जाधव यांनी केला. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS