...तर राज ठाकरेंना दोन कोटी देईन- अबू आझमी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

22 August 2012

...तर राज ठाकरेंना दोन कोटी देईन- अबू आझमी



...तर राज ठाकरेंना दोन कोटी देईन- अबू आझमी
भिवंडीमध्ये दोन महिन्यांमध्ये एक लाख बांगलादेशी नागरिक शोधून दाखविले तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना दोन कोटी रुपयांचा धनादेश देईन, असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आझमी आज (बुधवार) सांगितले.राज हे कूपमंडूक प्रवृत्तीचे आहेत, अशी टीकाही त्यांनी केली. 
   राज ठाकरे यांनी काढलेल्या मार्चादरम्यान आझमींवर जोरदार टीका केली होती. राज यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना पत्रकार परिषदेत बोलताना आझमी म्हणाले, "राज हे शिव्या देऊन टाळ्या मिळवत आहेत. शिव्या देऊन टाळ्या मिळविणे अवघड नाही. परवानगी नसताना राज यांनी काल मोर्चा काढला होता. 11 ऑगस्ट रोजी हिंसाचार करणारेच कालच्या मोर्चात सहभागी झाले होते.' 
   आझमी पुढे म्हणाले, "राज, महाराष्ट्र म्हणजे देश नव्हे. जरा बाहेर पडा. राज हे दलित व मुस्लिमांच्या विरोधात आहेत. त्यामुळे त्यांचा हिंदुत्ववादी चेहरा समोर आला आहे. 11 ऑगस्ट रोजी झालेली दंगल ड्रग्ज माफियांनी घडविली आहे. दंगलीच्या वेळी मी तेथे हजर नव्हतोच.' 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS