10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2012

10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी


10 टक्के पाणीकपात रद्द करण्याची मागणी
मुंबई : ऑगस्ट महिन्याच्या उत्तरार्धात आणि सप्टेंबरमध्ये मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या तलावक्षेत्रात वरुणराजाने केलेल्या कृपेमुळे समाधानकारक पाणीसाठा तलावांमध्ये जमा झाला आहे. तसेच परतीच्या पावसाचा जोर असाच राहिला तर भविष्यातील पाण्याची चिंता मिटेल. असे असूनही महापालिका प्रशासनाकडून अद्यापि 10 टक्के पाणीकपात रद्द करण्यात आलेली नाही. उपलब्ध पाण्याचा साठा लक्षात घेऊन प्रशासनाने10 टक्के पाणीकपात रद्द करावी व मुंबईकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते ज्ञानराज निकम यांनी पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्याकडे पत्राद्वारे केली.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS