दूषित पाण्यामुळे गोराईत काविळीची साथ - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

12 September 2012

दूषित पाण्यामुळे गोराईत काविळीची साथ


दूषित पाण्यामुळे गोराईत काविळीची साथ
मुंबई : बोरिवली (प.) येथील गोराईच्या म्हाडा वसाहतीत दूषित पाण्यामुळे थंडी ताप, अतिसार, कावीळ, मलेरिया अशा साथींच्या आजारांनी थैमान घातले आहे. या वसाहतीला अनेक दिवसांपासून अशुद्ध व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती स्थानिक नगरसेवक शिवा शेट्टी यांनी पालिकेच्या अर्थसंकल्प सभेत बोलताना दिली. त्याचबरोबर शेट्टी यांनी गोराई गावातील कोळी बांधव वीज, पाणी, आरोग्यासारख्या प्राथमिक गरजांबरोबरच स्मशानभूमी, रस्ते अशा अनेक मूलभूत गरजांपासून वंचित असल्याची व्यथाही महापौरांसमोर मांडली. गोराई गाव हे प्रामुख्याने पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते, मात्र येथील कोळी बांधवांना त्याचा फायदा कमी; परंतु नुकसान अधिक होत आहे. येथील रिसॉर्ट व लॉजेसला अनधिकृत जोडवाहिन्या जोडण्यात आलेल्या आहेत

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS