तारापूर अणुशक्ती केंद्रातील 210 मेगावॅटचा प्रकल्प बंद
|
| बोईसर : तारापूर अणुशक्ती केंद्रातील 210 मेगावॅट वीज निर्मिती करणारा एक नंबरचा प्रकल्प देखभाल, दुरुस्ती तसेच निरीक्षण व परीक्षणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून बंद आहे. केंद्रीय अणुऊर्जा नियामक मंडळाकडून परीक्षणाबाबतचा अहवाल प्राप्त होईपर्यंत त्या प्रकल्पातून पुढील काही दिवस वीज निर्मिती होणार नाही. तारापूर येथे 43 वर्षापूर्वी अमेरिकेच्या सहाय्याने सुरू झालेल्या भारतातील पहिल्या अणुशक्ती केंद्रातील 1 व 2 क्रमाकांच्या दोन्ही प्रकल्पांतून प्रत्येक 210 मेगावॅट वीज निर्मिती उत्पादन सुरू आहे. त्यानंतर 12 सप्टेंबर 2005 साली सुरू झालेल्या चौथ्या तसेच 18 ऑगस्ट 2006 पासून सुरू झालेल्या तिसर्या प्रकल्पातून वीज निर्मितीला प्रारंभ झाला. त्या दोन्ही प्रकल्पांतून सुरुवातीला 350 मेगावॅट प्रमाणे व नंतर टप्प्याने क्षमता वाढवून त्या प्रकल्पांमधून पूर्ण क्षमतेने आजपावतो प्रत्येकी 540 मेगावॅट प्रमाणे वीज निर्मिती सुरू आहे. तारापुरात निर्माण होणार्या विजेपैकी 40 टक्के महाराष्ट्राला तर उर्वरित वीज गुजरात, मध्य प्रदेश, दीव, दमण, दादरा, नगर हवेली, गोवा राज्यांना पुरवली जाते. तिसर्या व चौथ्या प्रकल्पातील अणुभट्टय़ा पूर्णत: भारतीय बनावटीच्या आहेत. तांत्रिक बिघाड झाल्यास किंवा इंधना पुनर्भरणाच्या कामांसाठी दर 18 महिन्यांनी त्या प्रकल्पातून अणुभट्टय़ा बंद ठेवल्या जातात. |


No comments:
Post a Comment