राज्यपालांनी घेतली विकासकामांची माहिती - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राज्यपालांनी घेतली विकासकामांची माहिती

Share This
राज्यपालांनी घेतली विकासकामांची माहिती
मुंबई : राज्याचे सार्वजनिक बांधकाम तथा पर्यटन विकासमंत्री छगन भुजबळ, सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे, क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी गुरुवारी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची राजभवन येथे भेट घेऊन आपल्या खात्याच्या कामाबद्दलची माहिती त्यांना दिली. छगन भुजबळ, शिवाजीराव मोघे, सचिन अहिर यांनी सकाळी, तर पद्माकर वळवी यांनी संध्याकाळी राज्यपाल के. शंकरनारायणन यांची भेट घेऊन त्यांना आपल्या खात्यामार्फत सुरू असणार्‍या विकासकामांची माहिती दिली.

छगन भुजबळ यांनी पर्यटन क्षेत्रात काय विकासकामे सुरू आहेत याची माहिती दिली. गोवा व केरळ येथील राज्य सरकारकडून पर्यटन विकासासाठी भरीव निधीची तरतूद करण्यात येते, मात्र आपल्याकडे अल्प निधी उपलब्ध होत असून त्यात वाढ होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.त्यावर राज्यपालांनी पर्यटन वाढीसाठी अनुकूल परिस्थिती असून येथील किल्ले व बौद्धकालीन गुंफांच्या ठिकाणी हॉटेल्स व रस्ते सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी राज्य सरकारकडून मागास प्रवर्गाच्या विकासासाठी राबवत असलेल्या विकास योजनांची माहिती दिली. क्रीडा व युवक कल्याणमंत्री पद्माकर वळवी यांनी विविध स्पर्धामध्ये पुरस्कार मिळविणार्‍या क्रीडापटूंना राज्य सरकार नोकर्‍या देऊन प्रोत्साहित करत असल्याचे सांगितले. तर गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी मुंबई, नागपूर व औरंगाबादमध्ये म्हाडातर्फे सॅटेलाईट सिटी स्थापन करण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचे सांगितले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages