गणेशोत्सवात सोनसाखळी चोरांचा सुळसुळाट
मुंबई : सोनसाखळी चोरांनी ऐन गणेशोत्सवात धुमाकूळ घातला असून महिलांना धक्के मारून, खाली पाडून त्यांच्या अंगावरील दागिने खेचून ते पळ काढत आहेत. मात्र बोटावर मोजता येईल एवढय़ाच प्रकरणातील सोनसाखळी चोरांना पकडण्यात यश मिळत असल्याने या चोरटय़ांची हिंमत वाढली आहे.
मुंबईतील गुन्हेगारी आवाक्यात असली तरी घरफोडी आणि सोनसाखळीच्या गुन्ह्यांत कमालीची वाढ झाली आहे. वाढत्या सोनसाखळी चोरीच्या घटनांची आकडेवारी पाहून मुंबई पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंह यांनी सोनसाखळी चोरांविरुद्ध मोक्कांतर्गत कारवाई करण्याचे संकेत दिले. मात्र त्यालाही न जुमानता सोनसाखळी चोरांनी आपल्या कारवाया जोराने सुरू ठेवल्या आहेत. ऐन गणेशोत्सवात बुधवारी सायंकाळी माटुंगा (पू.), डॉ. बी. ए. रोड, सायनकडे जाणार्या रस्त्यावर महेश्वरी सर्कलच्या उत्तरेस शोभा द्वाटिका (49) या रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दुकलीने शोभा यांना धक्का मारून त्यांच्या गळय़ातील 1 लाख रुपयांचे सोन्याचे मंगळसूत्र खेचून नेले. कांदविली (प.), गोराई-चारकोप रोड, चारकोप डेपोजवळ तर चोरटय़ांनी कहर केला. पती व मुलासह जाणार्या अनिता थोरले (32) यांना मोटारसायकलवरून आलेल्या दोघा आरोपींनी खाली पाडून त्यांच्या गळय़ातील 55 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून नेले, तर चुनाभट्टी येथेही ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे रोडवरून रिक्षाने प्रवास करत असलेल्या स्वाती पाटील (42) यांच्या गळय़ातील 30 हजारांचे मंगळसूत्र अज्ञात मोटारसायकलवरील दोघा आरोपींनी खेचून नेले.

No comments:
Post a Comment