महाराष्‍ट्र पोलिसांची कारवाई नियमानुसारच - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

महाराष्‍ट्र पोलिसांची कारवाई नियमानुसारच


महाराष्‍ट्र पोलिसांची कारवाई नियमानुसारच


बिहारी नागरिकांच्या मुद्द्यावर नितीश कुमार अतिशय खालच्या दर्जाचे राजकारण करीत आहेत. महाराष्‍ट्र पोलिसांनी नियमानुसारच कारवाई केली, अशा शब्‍दात मुख्‍यमंत्री पृथ्‍वीराज चव्‍हाण यांनी नितीश कुमार यांना खडे बोल सुनावले आहेत. 

मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरेंवर कारवाई करण्यास महाराष्ट्र सरकार कुचराई करत असल्याचा आरोप नितीश कुमार यांनी दोन दिवसांपूर्वी केला होता. तसेच काँग्रेसनेच राज ठाकरेंना मोठे केल्‍याचा आरोपही बिहारच्‍या नेत्‍यांकडून झाला होता. त्‍यावर अखेर मुख्‍यमंत्र्यांनीच उत्तर दिले आहे. चव्‍हाण यांनी सांगितले, नितीश कुमार हे बिहारच्‍या मुद्यावरुन अतिशय खालया दर्जाचे राजकारण करीत आहेत. मुंबई पोलिसांनी अमर जवान स्मारकाची तोडफोड करणाऱ्या अब्दुल कादीर या बिहारी तरुणाला पकडण्यासाठी भारतीय दंडविधानाच्या कलम ४१ आणि ४२ अन्वये कारवाई केली. या कलमानुसार पोलिसांना भारताच्या कोणत्याही भागातून एखाद्या आरोपीला विना वॉरंट अटक करता येते. त्यामुळे मुंबई पोलिसांची कारवाई कायदेशीर असून बिहारच्‍या पोलिस महासंचालकांकडून कोणतेही पत्र पाठविण्‍याची गरजच नव्‍हती, असे खडे बोल मुख्‍यमंत्र्यांनी सुनावले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS