एससी-एसटी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण विधेयक मंजूर
सरकारी नोकरीतील बढतीत एससी-एसटी या अनुसूचित जातींमधील कर्मचा-यांना आरक्षण देणा-या विधेयकास केंद्रीय मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजूरी दिली. या विधेयकानुसार अनुसूचित जाती- जमातीतील कर्मचा-यांना सरकारी नोकरीत बढतीसाठी आरक्षण मिळू शकेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंगळवारी झालेल्या बैठकीत या विधेयकाला मंजूरी मिळाली. यासाठी घटनादुरुस्ती विधेयक मांडण्यात येणार असून एक- दोन दिवसांत हे विधेयक अधिवेशनात मांडण्यात येईल.
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या या निर्णयावर विविध प्रतिक्रिया उमटत असून समाजवादी पक्षाचे नेते राम गोपाल यादव यांनी या निर्णयाला विरोध केला आहे. मंत्रिमंडळाचा हा निर्णय अन्यायकारक असून आम्ही या विधेयकाला विरोध करू असे ते म्हणाले.
तर बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायवतींनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. आम्ही या विधेयकासाठी खूप लढा दिला आहे. बहुजन समाज पक्षानेच राज्य सभेत एप्रिलमध्ये हा मांडला होता. अखेर आता या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजूरी मिळाली आहे. आम्ही या निर्णयचे स्वागत करतो, असे त्या म्हणाल्या.
|
Post Top Ad
05 September 2012
Home
Unlabelled
एससी-एसटी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण विधेयक मंजूर
एससी-एसटी कर्मचा-यांना बढतीत आरक्षण विधेयक मंजूर
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
JPN NEWS हे विश्वासार्ह, निष्पक्ष आणि वेगवान पत्रकारितेसाठी ओळखले जाणारे मराठी डिजिटल न्यूज पोर्टल आहे. मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरातील ताज्या घडामोडी, ब्रेकिंग न्यूज, राजकारण, नागरी प्रशासन, शासकीय योजना, उद्योग-व्यवसाय, शिक्षण, रोजगार, आरोग्य, तंत्रज्ञान, क्रीडा, मनोरंजन आणि जनहिताच्या विषयांवरील अचूक व वस्तुनिष्ठ बातम्या आम्ही वाचकांपर्यंत पोहोचवतो. सत्य, विश्वासार्हता आणि जबाबदार पत्रकारिता हीच आमची ओळख आहे. अधिक माहितीसाठी भेट द्या – www.jpnnews.in


No comments:
Post a Comment