हम है तब तक बिहारी को डरने की जरूरत नही - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

हम है तब तक बिहारी को डरने की जरूरत नही

हम है तब तक बिहारी को डरने की जरूरत नही
DSC_6321.JPGDSC_6362.JPG
मुंबई : बिहारी जनता व हिंदी चॅनलप्रकरणी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेला विरोध करत रिपाइं नेते रामदास आठवले यांनी 'हम है तब तक बिहारी को डरने की जरूरत नही' असे सांगत बिहारींना पाठिंबा दिला. याच वेळी २०११ च्या जनगणनेनुसार एससी एस टी यांची लोकसंख्या साढेचोवीस टक्के असल्याने त्याप्रमाणात आरक्षण मिळायला पाहिजे अशी मागणी आठवले यांनी केली।

शिवसेना-भाजपा-रिपाइंची महायुती सत्तेवर येणार असल्यामुळे हजारो लोक विविध पक्षांतून रिपाइंत येत आहेत, असा दावाही आठवलेंनी केला. देवदासी, आराधी, जोगतीण, पोतराज, तृतीयपंथी यांनी शेकडोच्या संख्येने मंगळवारी रिपाइंत प्रवेश केला. त्या वेळी आठवले म्हणाले. मुख्यमंर्त्यांनी या समाजाला आश्वासनाशिवाय काही दिले नाही. आम्ही सत्तेत आल्यानंतर या समाजाच्या मागण्या पूर्ण करू . या वेळी ज्युलिया या इटालियन महिलेने या समाजासाठी न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा दिला. जगभरात या समाजाचे हक्क व भारतामधील स्थिती याबाबत ज्युलियाने एक अहवाल सरकारला दिला आहे.

प्रमोशनमध्ये आरक्षण हा सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. एस.सी./एस.टी., आदिवासी समाजाची संख्या पाहता आरक्षण अजून वाढले पाहिजे. त्याचबरोबर मराठा/ब्राह्मण समाजाचाही विचार झाला पाहिजे. शिवसेना-भाजपाचे व रिपाइंचे वेगवेगळय़ा मुद्दय़ांवर मतभेद असले तरी सत्तेत येण्यासाठी आम्ही त्याबाबत गांभीर्याने घेणार नाही, असे आठवले म्हणाले.

हिंदी भाषिक चॅनलनेही बातम्या देताना जरा भान ठेवावे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यापेक्षा आमचा समाज आक्रमक आहे, मात्र निवडणुकीत दुसर्‍याला जिंकून देण्यात अग्रेसर असल्यामुळे आम्ही सत्तेवर येऊ शकलो नाही. आता महायुतीच्या माध्यमातून आम्ही सत्तेवर येणारच, असा विश्वास आठवले यांनी या वेळी व्यक्त केला

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS