पंतनगर पुनर्विकासाबाबत मेळावा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

पंतनगर पुनर्विकासाबाबत मेळावा

पंतनगर पुनर्विकासाबाबत मेळावा
पंतनगर वसाहतीला ५० वर्षे पूर्ण झाली आहेत. सर्व इमारती जीर्ण व मोडकळीस आल्या आहेत.मोठी घरे मिळतील म्हणून रहिवाश्यांनी इमाराई खाली केल्या परंतु काही इमारतींचा विकास झाला त्यांना ओ सी मिळाल्या नाहीत तर बहुतेक इमारती खाली करून ४ टे ५ वर्षे खाली केल्या तरी पुनर्विकासाला सुरवातच झाली नाही.म्हाडाने चटई क्षेत्र निदर्शक धोरणाबाबत धरसोड वृत्ती अवलंबली असून नक्की किती एफ एस आय मिळणार याची घोषणा व अंमलबजावणी यामध्ये तफावत आहे. ,हाडामध्ये ९०० हून अधिक फायली मंजुरी साठी लाल फितीत अडकून पडल्या आहेत. याबाबत आवाज उठवण्यासाठी पंतनगर पुनर्विकास मंच यांच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन रविवार दिनांक १६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता झेवेरबेन सभागृह, घाटकोपर पूर्व येथे करण्यात आले आहे. या मेळाव्याचे उद्घाटन विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे करणार असून आमदार प्रकाश मेहता अध्यक्ष स्थान भूषविणार आहेत. यावेळी महाराष्ट्रा सोसायटीस वेल्फेर असोसिएशन चे रमेश प्रभू , दत्ताराम गुजर, अजित ताम्हाणे उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.  
-- 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS