दरवाढ "आम आदमी' विरोधी -मायावती - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

दरवाढ "आम आदमी' विरोधी -मायावती



दरवाढ "आम आदमी' विरोधी -मायावती
लखनौ- डिझेल दरवाढ आणि सवलतीच्या दरातील सिलिंडरची संख्या कमी करण्याचा निर्णय "आम आदमी' विरोधी असल्याचे सांगून बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांनी केंद्र सरकारवर आज (शनिवार) सडकून हल्ला चढविला.

यासंदर्भात मायावती म्हणाल्या, की डिझेल दरवाढ आणि सिलिंडरची संख्या कमी करण्याच्या निर्णयाचा मध्यम वर्गीय आणि गरीब जनतेवर विपरीत परिणाम होणार आहे. डिझेल दरवाढीमुळे जगण्याचे मूल्य वाढेल. जेव्हा केव्हा केंद्र सरकारने जनविरोधी निर्णय घेतला आहे, तेव्हा बसपने त्याला विरोध केला आहे. सरकारच्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी 9 ऑक्‍टोबर रोजी विशाल रॅली काढण्यात येणार आहे. त्यानंतर केंद्र सरकारला बसपने दिलेला पाठिंबा काढायचा की नाही, याचा निर्णय घेतला जाईल. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS