पवारांचे केंद्रात वजन उरले नाही : आंबेडकर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

पवारांचे केंद्रात वजन उरले नाही : आंबेडकर

पवारांचे केंद्रात वजन उरले नाही : आंबेडकर


पुणे - ‘ममता, मुलायमसिंह आणि मायावतीच केंद्रातील सरकार पाडू शकतात. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे ती ताकद नाही. केंद्र सरकारला पाठिंबा देण्याखेरीज पवार काही करु शकत नाहीत. त्यांचे केंद्रात वजन उरलेले नाही,’ अशा शब्दांत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षांवर टीका केली.

केंद्राच्या दरवाढीच्या निर्णयांमुळे सर्वाधिक अन्याय शेतकरी वर्गावर होणार आहे. तरीही ‘राष्ट्रवादी’ काहीच करत नसल्याचे आश्चर्य वाटते. आता तरी ममता, मुलायमसिंह व मायावती यांनी कॉंग्रेसचा पाठींबा काढून घेऊन सरकार खाली खेचावे. तेल कंपन्यांचा तोटा झाल्याचे सांगून डिझेलची दरवाढ केल्याचे सांगितले जाते. मात्र ही स्पष्ट धुळफेक आहे. देशातील तेल कंपन्यांना वीस हजार कोटींचा फायदा झाला आहे, असा दावा करून आंबेडकर म्हणाले, की भाववाढ रोखण्यासाठी डिझेलवरील कर कमी करण्याची गरज आहे.

टू जी स्पेक्ट्रम आणि कोळसा खाणींचे परवाने वाटताना खासगी कंपन्यांना कोट्यवधी रुपयांची नफेखोरी करू देणारे सरकार या देशातील सर्वसामान्य जनतेकडून मात्र तिप्पट कर आकारते, असा आरोपही त्यांनी केला.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS