बिहारी जनतेच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरू : रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2012

बिहारी जनतेच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरू : रामदास आठवले

बिहारी जनतेच्या रक्षणार्थ रस्त्यावर उतरू : रामदास आठवले

मुंबई- मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे बिहारी, यूपींच्या विरोधात अकारण असंतोष पेटवत आहेत. मुंबईतील परप्रांतीयांना कोणी हुसकावण्याचा प्रयत्न केल्यास रिपाइंचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, अशी ग्वाही रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी रविवारी दिली. ठाणे जिल्ह्यातील वाडा येथील युवक कार्यकर्ता शिबिरात ते बोलत होते.

बिहारी आणि यूपींच्या विरोधात राज मुंबईकरांच्या भावना भडकावत आहेत. त्यांच्या बेताल वक्तव्यामुळे महाराष्‍ट्राबाहेरील मराठी माणसाची सुरक्षितता धोक्यात येणार आहे. तसे झाले तर मात्र राज यांनाच महाराष्‍ट्रातून चालते व्हा, म्हणण्याची वेळ येऊ शकते. मुंबईतील बिहारी आणि यूपी लोक आपलेच बांधव असून त्यांना कोणी हात लावला तर आम्ही त्यांचा सामना करू. राज यांना राज्याबाहेरील मराठी माणसांची जराही कळकळ नाही. महाराष्टÑबाहेरील मराठी माणसांच्याही संरक्षणास आम्ही कटिबद्ध असल्याचे आठवले म्हणाले. 

राज यांची भूमिका संविधानविरोधी आहे. मात्र या देशात ठाकरे घराण्याचे राज्य नव्हे, तर लोकशाही आहे. त्यामुळे यापुढे राज यांची संविधानविरोधी बेताल वक्तव्ये आम्ही खपवून घेणार नसल्याचे आठवले म्हणाले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS