अफजल गुरू, कसाबच्या फाशीसाठी आरपीआय राष्ट्रपती भवनाला घेराव घालणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 September 2012

अफजल गुरू, कसाबच्या फाशीसाठी आरपीआय राष्ट्रपती भवनाला घेराव घालणार


अफजल गुरू, कसाबच्या फाशीसाठी 

आरपीआय राष्ट्रपती भवनाला घेराव घालणार 

अफजल गुरूचा फाशीसंदर्भातील दयेचा अर्ज अद्यापि पल्रंबित आहे. आता कसाबचाही फाशीसंदर्भातील दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे जाईल. या दोन्ही अर्जावर दोन महिन्यांत निर्णय देऊन त्यांची फाशी कायम न केल्यास आरपीआय राष्ट्रपती भवनाला घेराव घालेल, असा इशारा आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी शनिवारी वाशी येथे केंद्र सरकारला दिला. 


आठवले पुढे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने कसाबची फाशी कायम ठेवली आहे. आता तोही राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज करेल. यापूर्र्वीच संसदेवर हल्ला करणार्‍या अफजल गुरूच्या दयेच्या अर्जावर निर्णय देणे पल्रंबित आहे. कसाबच्या अर्जाबाबतही अशा प्रकारे पुनरावृत्ती होऊ नये. हे दोन्ही अर्ज येत्या दोन महिन्यांत राष्ट्रपतींनी निकालात काढून त्यांची फाशी कायम करावी, अन्यथा आरपीआयच्या वतीने देशभरात आंदोलन केले जाईल. त्याचप्रमाणे राष्ट्रपती भवनाला घेराव घालून निदर्शने केली जातील, असा इशारा त्यांनी दिला. 

माथेफिरूंनी केलेल्या मुंबई दंगलीत पाकिस्तानचा हात असण्याची शक्यता असून अशा देशद्रोह्यांना क ठोर शिक्षा व्हावी. या दंगलीतील आरोपींना बिहारमधून अटक केल्यावर तेथील सचिवांनी मुंबई पोलिसांबद्दल केलेले विधान चुकीचे व घातक असून ते भारतीय संविधानाचा अपमान करणारे आहे. या प्रकरणी तेथील मुख्यमंर्त्यांनी त्या सचिवांना त्वरित निलंबित करावे. या विधानाबाबत राज ठाकरे यांनी दिलेल्या प्रतिक्रियेशी आपण सहमत नसून त्यांच्या अशा प्रतिक्रियेमुळे प्रांतवाद निर्माण होऊ शकेल, बिहारमधील मराठी लोकांवर अन्याय होऊ श्केल; मात्र बिहारमधील आरपीआय व तेथील मुख्यमंर्त्यांनी मराठी लोकांना संरक्षण द्यावे, असे आठवले म्हणाले.  

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS