तलावांत मुबलक जलसाठा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

03 September 2012

तलावांत मुबलक जलसाठा

तलावांत मुबलक जलसाठा

मुंबई : दडी मारलेल्या पावसाने गेल्या काही दिवसांत दमदार उपस्थिती लावल्याने तलावांतील जलसाठय़ात वाढ झाली आहे. तलावात सध्या 10 लाख दशलक्ष लिटरहून अधिक जलसाठा आहे. त्यामुळे पाणीटंचाईचा सामना करणार्‍या मुंबईकरांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.

मोडक सागर, विहार, भातसा, तानसा, अप्पर वैतरणा आणि तुळशी या तलावांमधून मुंबईला दररोज 3450 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईला पुढील वर्षासाठी किमान 13 लाख दशलक्ष लिटर एवढा पाणीसाठा तलावांमध्ये असणे आवश्यक आहे. गेल्या चार दिवसांत पावसाने दमदार हजेरी लावल्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मोडक सागर आणि मध्य वैतरणा तलाव भरून वाहू लागले आहेत.मोडक सागर तलाव 8 ऑगस्ट रोजी भरून वाहू लागले होते. मध्य वैतरणा तलावाचे काम सध्या सुरू असल्यामुळे 258 मीटरपर्यंत पाण्याची पातळी ठेवण्यात आली आहे. 

परतीच्या पावसाने दमदार उपस्थिती लावल्यास तानसा, विहार, तुळशी तलाव भरून वाहू लागतील. यापैकी तानसा तलावातील जलसाठय़ाने कमाल मर्यादा गाठण्यास अवघी 0.32 मीटर्सची गरज आहे. तुळशी तलावही भरून वाहण्यास फक्त 1.37 मीटर्सची तफावत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS