सिंचन घोटाळ्याची चौकशी एस आय टी मार्फत करावी - केजरीवाल / गडकरी यांचाही घोटाळ्याला पाठींबा - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

सिंचन घोटाळ्याची चौकशी एस आय टी मार्फत करावी - केजरीवाल / गडकरी यांचाही घोटाळ्याला पाठींबा


 
मुंबई / अजेयकुमार जाधव 
अजित पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाचा दिलेला राजीनामा मुख्यमंत्र्यांनी स्वीकारला पाहिजे, असे मत व्यक्त करून सिंचन घोटाळ्याची चौकशी एस आय टी मार्फत करावी अशी मागणी इंडिया अगेन्स्ट करप्शनचे अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी प्रेस क्लब,मुंबई मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केली

याशिवाय सुनिल तटकरे यांनाही पदावरून हटवले पाहिजे, असे मत केजरीवाल यांनी मांडले. तसेच सिंचन घोटाळा उजेडात आणणारे सिंचन खात्यातील मुख्य अभियंते विजय पांढरे यांना त्रास दिला गेल्यास इंडिया अगेन्स्ट करप्शनचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरतील, असा इशाराही दिला. सीबीआय आणि अँटी करप्शन ब्युरोवर सरकारचेच नियंत्रण असल्याने अशा प्रकरणांचा तपास तरी कोण करणार, असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. सुमारे ७०,००० कोटी रुपये खर्चून फक्त ०.१ टक्के जमीन सिंचनाखाली आली. यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून शेतकरी आत्महत्या करत आहेत या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना या घोटाळाबाजाना जवाबदार धरावे असे केजरीवाल म्हणाले.

या देशात सत्ताधारी आणि विरोधक एकत्र पार्टनरशिप मध्ये धंदे करत असल्याने विरोधक या देशात राहिलेच नसून या देशातील जनतेनेच विरोधकाची जवाबदारी व भुमिका पार पाडावी असे केजरीवाल म्हणाले.यावेळी मयंक गांधी यांनी राष्ट्रवादीचे मंत्री घोटाळ्यांमध्ये अडकत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हि धरणांच्या पैशावर चालणारी पार्टी आहे असा आरोप केला.

गडकरी यांचाही घोटाळ्याला पाठींबा
सिंचन घोटाल्याबाबातची माहिती विरोधी पक्षाच्या अध्यक्षांना दिली असता त्यांनी माझे शरद पवार यांच्या सोबत पार्टनरशिप मध्ये बिजनेस आहेत ते माझी कामे करतात मी त्यांची कामे करतो. आम्ही या विरोधात काही करू शकत नाही असे सांगितले. यामुळेच अजित पवार यांच्या विरोधात काहीही भाष्य करण्याचे भाजपाने टाळले असे सांगून विरोधी  पक्षाचे अध्यक्ष नितीन गडकरी असल्याचे स्पष्ट संकेत अंजली दमानिया यांनी दिले. यावरून विरोधी पक्षाचीही घोटाळ्याला पाठींबा असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला. दरम्यान आपली दमानियांशी कधीही भेट झालेली नाही, असा खुलासा भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनी केला आहे. 

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS