मुंबईचे नगरसेवक दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

मुंबईचे नगरसेवक दोन महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत

मुंबई महापालिकेच्या लेटलतिफ कारभाराचा फटका यावेळी दस्तुरखुद्द नगरसेवकांना बसला आहे. लेखा विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे नगरसेवकांना  जुलै व ऑगस्ट या दोन महिण्याचे मानधन मिळालेले नाही.

मुंबईतील नगरसेवकांना सध्या 10 हजार रुपये मासिक मानधन तसेच बैठकांना उपस्थित राहण्यासाठी भत्ता मिळतो. हे मानधन 25 हजार रुपये करण्याचा ठराव महासभेत मंजूर करण्यात आला आहे. या वाढीव मानधनाला अद्यापि मंजुरी मिळालेली नसली तरी नगरसेवकांचे मंजूर मानधनही दोन महिन्यांत मिळालेले नाही.

महापालिकेच्या चिटणीस विभागामार्फत मानधन मंजुरीसाठी पत्र लेखा विभागाला पाठविले जाते. त्यानंतर लेखा विभागामार्फत नगरसेवकांचे मानधन बॅंकेच्या खात्यात जमा होते. परंतु, मानधन न मिळाल्यामुळे नगरसेवकांच्या चिटणीस विभागात फेऱ्या वाढू लागल्या आहे. आता चिटणीस विभागातून लेखा विभागाला पत्र पाठविण्यात आले असून लेखा विभागाच्या तांत्रिक अडचणींमुळे नगरसेवकांचे मानधन अडकले असल्याची माहिती पुढे येत आहे.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS