बाबासाहेब कुपेकरांवर गुरुवारी अंत्यसंस्कार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

27 September 2012

बाबासाहेब कुपेकरांवर गुरुवारी अंत्यसंस्कार


बाबासाहेब कुपेकरांवर गुरुवारी अंत्यसंस्कार

विधानसभेचे माजी अध्यक्ष आणि राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांच्या पार्थिवावर गुरूवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील कानडेवाडी या त्यांच्या मूळ गावी शेतामध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्‍ट्रवादीचे नेते अजित पवार हे यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सांगण्यात आले.

कुपेकर यांचे बुधवारी सकाळी मुंबईत निधन झाले. सायंकाळी 5 वाजता विशेष विमानाने त्यांचे पार्थिव कोल्हापूर येथे आणण्यात आले. त्यांच्यासमवेत अन्य दोन विमानांमधून त्यांचे नातेवाईकही येथे आले. यावेळी विमानतळावर महापौर कादंबरी कवाळे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राजाराम माने, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. दिपक म्हैसेकर, जिल्हा पोलिस प्रमुख विजयसिंह जाधव यांनी त्यांना श्रध्दांजली वाहिली.

यानंतर शासकीय विश्रामगृह परिसरातील त्यांच्या सावली या बंगल्यामध्ये त्यांचे पार्थिव आणण्यात आले. यावेळी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज, संभाजीराजे, माजी खासदार उदयसिंगराव गायकवाड, यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून कुपकेर यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले.

No comments:

Post a Comment

JPN NEWS JPN NEWS

Post Bottom Ad

JPN NEWS