महाराष्ट्राला भारतापासून तोडू देणार नाही - रामदास आठवले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

19 September 2012

महाराष्ट्राला भारतापासून तोडू देणार नाही - रामदास आठवले


    
महाराष्ट्राला भारतापासून तोडू देणार नाही - रामदास आठवले
आनंदराज यांना मोठे करून प्रकाश आंबेडकर यांना संपवण्याचा डाव 
मनसे महायुती मध्ये आल्यास महायुतीमधून बाहेर पडू  
Mumbai / अजेयकुमार जाधव 
राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र धर्मामुळे महाराष्ट्राला भारतापासून वेगळे करण्याचा प्रयत्न आहे. परंतु आम्ही आमचा भारत धर्म पळून महाराष्ट्राला भारतापासून तोडू देणार नाही असे रामदास आठवले यांनी जाधव प्रेस नेटवर्क या खाजगी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

येणाऱ्या काळात मनसे महायुतीमध्ये आल्यास महायुतीला कोणताही फायदा होणार नाही. मनसेला काँग्रेस आणि सेनेच्या विरोधातील मते मिळतात. मनसे सोबत आल्यास महायुतीला फारसा फायदा होणार नाही असे आठवले म्हणाले. राज ठाकरे यांनी इंदू मिल व दलित नेत्यांच्या विरोधात टिंगल टवाळी केली आहे. हे दलित जनता कधीही विसरू शकणार नाही. बाळासाहेब ठाकरे यांना धोका देण्याचे काम राज ठाकरे यांनी केले आहे यामुळे बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे मनसेला सोबत घेण्यास तयार होणार नाहीत असे सांगून मनसे व शिवसेना एकत्र आल्यास आम्ही महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेवू असे आठवले यांनी सांगितले.

आजच्या परिस्थितीत मनसे कुठल्याही आघाडी मध्ये जाण्याची शक्यता कमी आहे परंतु स्वबळावर लढून कोणालाही फायदा होणार नसल्याने वेळ आल्यास मनसे राष्ट्रवादी सोबत जाऊ अशी शक्यता आठवले यांनी व्यक्त केली. याचवेळी महायुती मध्ये एखादा नवीन पार्टनर घ्याचा असल्यास सध्याच्या सेना भाजपा व आरपीआय या तिन्ही पक्षांनी एकत्र बसून चर्चा करायला हवी असे आठवले यांनी सांगितले.

रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर यांनी केलेय टीकेबाबत बोलताना इंदू मिलच्या प्रश्नाला सुरुवात कोणी केली असा प्रश्न उपस्थित करून इंदू मिलचे आंदोलन सतत सुरु ठेवण्याचे काम आम्ही केले आहे.आम्ही क्रेडीट घेण्याचे काम करत नाही आम्ही कोणावर टीकाही करत नाही.कोणावर टीका करून नेता मोठा होत नाही जे टीका करत नाहीत लोकांचे काम करतात तेच मोठे होतात.आनंदराज हे इंदू मिल मध्ये घुसले तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत केले त्यानीही आमचे स्वागत  करावे असे सांगून आनंदराज यांना मोठे करून प्रकाश आंबेडकर यांना संपवण्याचा डाव काँग्रेस आणि राष्ट्रवादी खेळत आहे असे आठवले यानी सांगितले. तसेच आम्ही कोणालाही संपवत नाही कोण संपले हे समाज ठरवेल असा टोला आठवले यांनी आनाद्राज यांच्या वक्तव्यावर लगावला.

२० सप्टेंबरच्या बंद बाबत बोलताना आमचा बंदला पाठींबा असला तरी महाराष्ट्रामध्ये असलेले गणेश उत्सव लक्षात घेता बंद मध्ये सहभागी होणार नाही. परंतु महाराष्ट्राबाहेर आमचे कार्यकर्ते बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करतील असे आठवले यांनी सांगितले. पारधी समाजाच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी वेगळ्या आश्रम शाळा ,पारध्यांना नोकऱ्या किवा धंदा करण्यासठी शासनाकडून कर्ज मिळावे, पारध्यांचे पुनर्वसन करावे, पारध्यांना नोकरी किवा धंदा करता यावा यासाठी  महारष्ट्र शासनाने लक्ष्य घालावे यासाठी गृह मंत्री आर आर पाटील यांची तसेच संबधित मंत्रांची भेट घेणार असल्याच आठवले यांनी सांगितले...         

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS