पालिकेच्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 September 2012

पालिकेच्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पालिकेच्या आरोग्य शिबिरांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
८१ आरोग्य शिबिरांचा ३७ हजार ७८५ नागरिकांनी घेतला लाभ 
 महापालिकेच्या मुंबई आरोग्य अभियानांतर्गत आज आयोजित करण्यात आलेल्या रविवारीय आरोग्य शिबिरांना मुंबईकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.  आज (दिनांक १६ सप्टेंबर २०१२) मुंबई महापालिका क्षेत्रात विविध ७ ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या मोफत आरोग्य शिबिरांमध्ये ३,७६१ नागरिकांनी ह्या आरोग्य शिबिरांचा लाभ घेतला.  पावसाळ्यातील आजारांना प्रतिबंध करणे आणि नागरिकांमध्ये आरोग्याप्रती जाणीवजागृती निर्माण करणे, ह्या उद्देशाने अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती मनीषा म्हैसकर ह्यांच्या मार्गदर्शनात गेल्यावर्षी पासून ह्या आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत आहे.  

ह्या वर्षी ३ जून २०१२ पासून मुंबई आरोग्य अभियानांतर्गत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येत असून ह्यावर्षी आजवर आयोजित करण्यात आलेल्या एकूण ८१ शिबिरांचा ३७,७८५ नागरिकांनी लाभ घेतला आहे, ह्यामध्ये १८,५९६ पुरुष तर १९,१८९ महिलांचा समावेश आहे.

आज महापालिका क्षेत्रात आयोजित करण्यात आलेल्या सर्व म्हणजे ७ शिबिरांना अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) श्रीमती मनीषा म्हैसकर, संचालक (वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. संजय ओक, शिव येथील लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्री डॉ. संध्या कामत,  कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. अरुण बामणे, संयुक्त कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. श्रीधर कुबल, डॉ. दक्षा शहा , डॉ. प्रवीण बांगर ह्यांनी भेट देऊन तेथील कामाचा आढावा घेतला आणि शिबिराचा लाभ घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी चर्चा करून त्यांच्या अपेक्षा व प्रतिक्रिया जाणून घेतल्या. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS