'तंबाखू' दर्शनावर बंदी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

02 September 2012

'तंबाखू' दर्शनावर बंदी

'तंबाखू' दर्शनावर बंदी

गणेशोत्सव-नवरात्री उत्सवात गुटखा तंबाखुजन्य पदार्थ आणि मद्य उत्पादनाची जाहिरात करण्यास मुंबई महापालिकेने बंदी घातली आहे. तसेच अश्लिल जाहिराती प्रदर्शित करण्यासही उत्सव परिसरात मनाई करण्यात आली आहे. 

गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांना घेऊन त्यांचे पालक दर्शनासाठी जात असतात. मंडप परिसरातील गुटखा तंबाखुजन्य पदार्थ आणि मद्य उत्पादनाच्या जाहिराती तसेच अश्लिल जाहिराती अल्पवयीन मुलांच्या मनावर वाईट परिणाम करतात. या जाहिरातींवर बंदी घालावी अशी मागणी सलाम बॉम्बे फाऊंडेशन या संस्थेने पालिकेकडे केली होती. 

गणेशोत्सव व नवरात्री उत्सवात मंडप परिसरात प्रदर्शित होणाऱ्या जाहिरातींचे निकष आणि परवाना मूल्य ठरविण्यासंबंधीही पालिकेने परिपत्रक जारी केले आहे. मंडपात प्रदर्शित करण्यात येणाऱ्या जाहिरातींसाठी १२५ रुपये तर मंडप प्रवेशद्वार ते १०० मीटर अंतरापर्यंत व्यावसायिक जाहिराती लावण्यासाठी १०१ रुपये मूल्य आकारण्यात येणार आहे. जाहिरातींसाठी फूटपाथ व रस्त्यांवर खड्डे खणण्यास बंदी घालण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS