१५ हजार कोटींची एक्साईज ड्युटीची चोरी / याचिका दाखल
मुंबई / अजेयकुमार जाधव
मद्य बनवणाऱ्या कंपन्यांकडून खोटी म्यानुफ्याक्चरिंग किमत दाखवून १९९७ पासून आज पर्यंत १५ हजार कोटींची एक्साईज ड्युटीची चोरी झाल्याचा आरोप बैजू जिला यांनी पत्रकार परिषदेत केला.
१९९७ साली सरकारने मद्य बनवणाऱ्या कंपन्यांना म्यानुफ्याक्चरिंग किमत ठरवण्याचे अधिकार दिले आहेत.तेव्हापासून म्यानुफ्याक्चरिंग किमत दाखवण्याचे ओरकार सुरु आहेत. याबात २००८ साली विलास जयस्वाल यांच्या याचिकेवरील सुनवाई दरम्यान सरकारी अधिकारी कोर्टाची दिशाभूल करत असल्याचा शेरा न्यायमूर्तीनी मारला होता.तरीही अद्याप सरकार सुधारले नाही. ३५ मद्य बनवणाऱ्या कंपन्यांची तक्रार उत्पादन शुल्क विभागाचे सचिव आनंद कुलकर्णी यांच्याकडे केल्या त्यांनीही दुर्लक्ष केले म्हणून शासनाला १५ हजार कोटींच्या एक्साईज ड्युटीला मुकावे लागले आहे.
२१ ऑगस्ट रोजी उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मुंबई मध्ये या विषयावर चर्चा झाली होती तरीही कारवाही झाली नसल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली असून या याचिकेवर २४ सप्टेंबरला सुनवाई होणार आहे

No comments:
Post a Comment