खड्डे बुजवण्यासाठी भुशाचा वापर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

15 September 2012

खड्डे बुजवण्यासाठी भुशाचा वापर


खड्डे बुजवण्यासाठी भुशाचा वापर
मुंबई : रस्त्यावरील खड्डे बुजवण्यासाठी काही कंत्राटदारांकडून कोल्ड मिक्स मटेरियलऐवजी रेती व भुशाचा वापर केला जात असल्याने पुन्हा-पुन्हा रस्त्यावर खड्डे पडत असल्याचा आरोप भाजपा व मनसेच्या स्थायी समिती सदस्यांनी करून या कंत्राटदारांना व त्यांना पाठीशी घालणार्‍या अधिकार्‍यांवर पालिकेने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे व अतिरिक्त आयुक्त असिम गुप्ता यांच्याकडे केली.

यावर असिम गुप्ता यांनी कोल्ड मिक्स मटेरियल चांगले असतानाही ते न वापरता काही कंत्राटदार जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने कामे करतात, अशी कबुली देत अशा कंत्राटदारांनी खड्डे बुजवण्याची केलेली कामे तपासून त्याचा अहवाल सादर करण्याचे व दोषी कंत्राटदारांना काळय़ा यादीत टाकण्याचे आदेश संबंधित खाते अधिकार्‍यांना दिले असल्याचे सांगितले. मनसेचे गटनेते दिलीप लांडे, नगरसेवक चेतन कदम यांनी खड्डय़ांबाबत तीव्र संताप व्यक्त करत गणेश आगमनापूर्वी रस्त्यावरील खड्डे बुजवणार की नाही, असा सवाल अतिरिक्त आयुक्तांना केला. श्री गणेशाचे आगमन ज्या रस्त्यावरून होते, त्या सर्व रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. महापौर आणि मी खड्डय़ांचा आढावा घेत असल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS