तानसा ओव्हरफ्लो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

तानसा ओव्हरफ्लो


तानसा ओव्हरफ्लो


tansa2.jpg
सोमवारी सुरू झालेल्या तडाखेबंद पावसाने मुंबईकरांच्या पिण्याचा पाण्याची समस्या सुटण्याची चिन्हे आहेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये धुवांधार पाऊस पडत असून तानसा तलाव सोमवारी दुपारी ओव्हरफ्लो होऊन वाहू लागला आहे. तुळशी तलावही भरून वाहण्याच्या स्थितीत आहे. 

सोमवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाने काहीसा दिलासा मिळाला आहे. सोमवारी दुपारी १. ५५ मिनिटांनी तानसा तलाव भरून वाहू लागला. मुंबईच्या पाणीपुरवठ्यात महत्त्वाचे मानले जाणारे भातसा धरण पूर्ण भरण्यासाठी सात मीटर अप्पर वैतरणा ,पावणेतीन मीटर तर तुळशी तलावाची पातळी फक्त अडीच मीटर बाकी राहिली आहे. दुपारी तीन वाजेपर्यंत मोडकसागरमध्ये १९.८० मिमी तानसा ८७.८० मिमी विहार ७४.४० मिमी तुळशी ११३.० मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. सात तलावांमध्ये पाणीसाठा १० लाख ५० हजार एमएलडीच्या जवळ पोहचला आहे. मुंबईची जून २०१३पर्यंत तहान भागविण्यासाठी १३ लाख एमएलडी पाणीसाठा आवश्यक आहे. 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS