मेट्रोचा पूल कोसळला - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

05 September 2012

मेट्रोचा पूल कोसळला

मेट्रोचा पूल कोसळला
Metro2.jpg
अंधेरी कुर्ला मार्गावर हॉटेल लीलाजवळ बांधकाम सुरू असलेल्या मेट्रो रेल्वेच्या पुलाचा काही भाग मंगळवारी दुपारी कोसळला. प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात दोन जण ठार झाले असून, २० जण जखमी झाले आहेत. कोसळलेल्या ढिगा-याखाली मजूर आणि काही व्यक्ती अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जखमींना जवळच्या रूग्णालयात उपचारासाठी सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये दाखल केले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार या दुर्घटनेत २० जण जखमी आहेत. सायंकाळी ही घटना घडली, यावेळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी असते त्यामुळे ढिगा-याखाली नेमके किती लोक अडकेल, हे सांगणे कठीण आहे.  मेट्रो ब्रिजवर काम करणारे मजूर आणि रस्तावरील पादचारी या ढिगा-याखाली अडकेल असण्याची शक्यता आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलिस आणि अग्निशमन दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मदतकार्याला तातडीने सुरुवात झाली आहे.  

बांधकामाच्या भागाखाली दबल्याने उमेश साहू ३५या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर गोविंद या २६ वर्षीय तरूणाने आपले दोन्ही पाय गमावले असून त्याची प्रकृती गंभीर आहे सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत .सेव्हन हिल्स हॉस्पिटल मध्ये अन्य पाच जणांवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे तरपाच जणांवर कूपर हॉस्पिटल मध्ये उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती हॉस्पिटल कडून देण्यात आली आहे दाखल झालेल्या पाच जखमींमध्ये कोणीही गंभीर जखमी नसून त्यांच्यावर जनरल वॉर्ड मधअये उपचार सुरू असल्याची माहिती हॉस्पिटलचे वैद्यकिय अधिक्षक डॉ .नगरकर यांनी दिली 

सेव्हन हिल्स हॉस्पिटल लालसिंग ५२ ), कालू २८ ), जानकी घागरे ३१ ), सखाराम २८अशोक कुमार 

कूपर हॉस्पिटल विचित्र महंती २५ ), सूरज महल महंती ३९ ), शंकर सोरय्या ३० ),पुरूषोत्तम सिन्हा १८ ), मनोज सहाय ३० 

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

JPN NEWS